बुली बाई अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांची बदनामी केल्याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून दिल्ली पोलिसांनीही आसाममधून एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहे. अ‍ॅपद्वारे मुस्लीम महिलांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करून आभासी लिलाव करण्यात येत असल्याची तक्रार मुंबई सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये १८ वर्षीय तरुणी असून ती मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी अटक केलेला तरुणही मुख्य आरोप असल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Bulli Bai App: मुस्लिम महिलांचे फोटो टाकत लिलाव करणारं हे प्रकरण नेमकं काय आहे?

मात्र यादरम्यान पोलिसांना ट्वीटरच्या माध्यमातून एका युजरने जाहीर आव्हान दिलं असून आपणच या अ‍ॅपचे मास्टरमाइंड असल्याचा दावा केला आहे. हा ट्वीटर युजर नेपाळचा असल्याचा संशय असून यावेळी त्याने पोलिसांना उगाच निष्पाप तरुणांना त्रास देऊ नका अन्यथा बुली बाई २.० आणेन अशी धमकी दिली आहे.

या ट्विटर युजरने आपलं खऱं युजरनेम, पासवर्ड तसंच अ‍ॅप तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या सोर्स कोड देण्याची तयारी दर्शवली आहे. “तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे, मुंबई पोलीस. मी बुली बाई अ‍ॅपचा खऱा निर्माता आहे. तुम्ही अटक केलेले ते दोघं निर्दोष असून त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. त्यांना तात्काळ सोडा,” असं त्याने @giyu44 या आपल्या ट्विटर हँडलवर म्हटलं आहे.

Bulli Bai App: …तर मास्टरमाइंड असलेल्या ‘त्या’ १८ वर्षाच्या तरुणीला माफ करा; जावेद अख्तर यांचं ट्वीट चर्चेत

“जेव्हा हा सर्व गोंधळ सुरु झाला तेव्हा काय होईल याची मला कल्पना नव्हती, त्यामुळे मी माझ्या मित्रांची खाती वापरली. तो विशाल आणि स्वाती त्यांची खाती मी वापरली. त्यांना काय सुरु होतं याची कल्पनाही नव्हती. माझ्यामुळे ते अटक झाले आहेत. कमेंट करत माझी बदनामी करु शकता,” असंही त्याने म्हटलं आहे.

‘बुली बाई अ‍ॅप’ प्रकरणात धक्कादायक वळण; १२ वी पास १८ वर्षांची मुलगी मुख्य आरोपी; पोलीसही चक्रावले

मुंबई पोलीस सध्या या ट्विटर अकाऊंटच्या सहाय्याने संबंधिताची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई पोलिसांकडून तिघांना अटक

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. हे ट्विटर हँडल विशाल कुमार झा (२१) हा वापरत असल्याचे निष्पन्न झालं आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून तपासासाठी उत्तराखंड येथील रुद्रपूर येथे एक पथक रवाना झाले होते. त्या पथकाने याप्रकरणी श्वेता अनंत सिंह (१८) या तरुणीला अटक केली. या प्रकरणात वापरण्यात आलेली संशयित ट्विटर हँडल श्वेता सिंहने बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर आरोपी मयंक प्रदीपसिंह रावत ( २१) यालाही बुधवारी सायबर पोलिसांनी अटक केली. हे सर्व आरोपी समाजमाध्यमांवर एकमेकांच्या संपर्कात होते.

दरम्यान पोलीस याप्रकरणी आरोपींच्या बँक खात्याची तपासणी करत आहे. याप्रकरणी सायबर पोलीस सखोल तपास करणार असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी कोणाला अधिक माहिती असेल, अशा व्यक्तींनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही नगराळे यांनी केले. इतर राज्यांतील पोलिसांकडून या प्रकरणाबाबत सहकार्य मिळत नसल्याबाबत नगराळे यांनी नाराजी व्यक्त केली.

झा हा बंगळूरु येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षांत शिक्षण घेत होता. त्याची चौकशी केल्यानंतर त्याचा या प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

दिल्ली पोलीसांनी नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला केली अटक!

दिल्ली पोलिसांनी नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला आसाममधून अटक केली आहे. हाच तरुण या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याची माहिती डीएसपी केपीएस मल्होत्रा यांनी एएनआयला दिली आहे.

बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ या स्पेशल सेलनं आसाममधून अटक केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. यासंदर्भात या स्पेशल सेलचे डीसीपी केएसपी मल्होत्रा यांनी सविस्तर माहिती दिली. “नीरज मल्होत्रा यानंच गिटहबवर बुली बाई अ‍ॅप तयार केलं आणि तोच या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. त्याला आम्ही आसाममधून अटक केली आहे. या अ‍ॅपचं ट्विटर अकाउंट देखील नीरज बिष्णोईच चालवत होता. त्याला आता दिल्लीला आणलं जात आहे”, अशी माहिती मल्होत्रा यांनी दिली आहे.

सहा ट्विटर खाती बंद

अटक आरोपी विशालकुमार झा याने गुन्ह्यांत सहा ट्विटर, दोन इन्स्टाग्राम व सात जीमेल खात्यांचा वापर केला आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावल्यानंतर त्याने सहा ट्विटर खाती बंद केल्याचे निष्पन्न झाले आहे.