धारावी पोलीस ठाण्याजवळील ९० फुटी रस्त्याचा काही भाग सोमवारी दुपारी खचला. नेमक्या त्याचवेळी तेथून जात असलेल्या शाळा बसचे चाक त्या खड्डय़ात अडकले. मात्र, यात कोणालाही दुखापत झाली नाही. बसमधील २० विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. रस्ता खचल्यामुळे ९० फूट रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खड्डय़ाभोवती बॅरिकेड उभे केले. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आज, मंगळवारी सकाळी हाती घेण्यात येणार आहे. रस्ता पूर्ववत होण्यासाठी तीन दिवस लागतील, असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader