खासगी प्रवासी आराम बस आणि डंपर यांची धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत होरपळून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नाशिक येथे घडली. दुर्घटनाग्रस्त बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या खासगी प्रवासी बसविरोधात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतला असून तसे आदेशच दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अंबानी धमकी प्रकरणः आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

ही कारवाई २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात आणि त्यापूर्वी मार्च महिन्यातही खासगी प्रवासी बस वाहतुकदारांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.

खासगी प्रवासी बस विरोधात विशेष तपासणी मोहीम हाती घेताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर नसणे, वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे केलेले बदल, मोटर वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकारणे, अग्निशमन यंत्रणा, आपत्कालिन निर्गमन दार आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत का याची तपासणी करण्यात येणार आहे. बस सुटण्याच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यांवर ही तपासणी करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील ५० प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून ही कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा- तिकीट वितरण यंत्र बिघडल्यास वाहकाच्या वेतनात कपात; बेस्ट उपक्रमाचा निर्णय, वडाळा आगारात मंगळवारी आंदोलन

हेही वाचा- विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या काळातही खासगी प्रवासी बस विरोधात पंधरा दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी जादा भाडे घेणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुक यांसह अन्य वाहतूक नियमांचे पालन होते का याची तपासणी करण्यात आली. राज्यात १० हजार बसची तपासणी करण्यात आली. त्यात १९५ बसमध्ये त्रुटी आढळल्या. केवळ ३६ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला होता. १६ ते २० मार्च २०२२ या काळात विशेष कारवाई करताना ६ हजार ६१० बसची तपासणी करण्यात आली. यापैकी १०३ बसवर जादा भाडे घेणे, १ हजार ४१८ बसवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, वाहन योग्यता प्रमाणपत्र नसणे, मोटर वाहन कर न भरणे, अग्निशमन यंत्रणा नसणे यासह अन्य वाहतूक नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bus inspection special campaign in the state after the nashik bus fire accident mumbai print news dpj