रंगीबीरंगी पतंगांचे गठ्ठे, फिरकीच्या लटकवलेल्या माळा, मांजा विकण्यासाठी आरोळी देणारा दुकानदार, भले मोठे उभारलेले मंडप आणि त्यासमोर जमलेली गर्दी हे चित्र कोणा पतंगाच्या दुकानाचे नसून बोरिवलीच्या योगीनगर येथील २४० या बेस्ट थांब्याचे आहे. गेल्या तीन दिवसांपासून बस थांब्यावर थाटले जाणारे हे दुकान प्रशासनाला दिसत नसल्याने स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याचसोबत पैसे देऊन दुकान थाटल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
दहिसर ते बोरिवली भागांतील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाने २४० क्रमांकाची सेवा सुरू केली आहे. ही बस सेवा कांदरपाडा दहिसर येथून चालवली जाते. ४४ थांबा घेऊन ही बस याच थांब्यावर परत आणली जाते. वर्तुळाकारमार्गे चालवल्या जाणाऱ्या या बस गाडीच्या दिवसभरात सुमारे पंधराहून अधिक फेऱ्या चालवल्या जातात. यात बोरिवली पश्चिम ते आयसी कॉलनी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाकूर पाखाडी या बस थाब्यांवर पतंगाचे भले मोठे दुकानच थाटले गेले आहे. त्यामुळे बस थांब्यावर थांबणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे.
बोरिवली पश्चिम येथील अत्यंत वर्दळीच्या मार्गापैकी एक असलेल्या योगीनगर परिसरात ठाकूर पाखाडी हा एकोणिसावा थांबा आहे. दिवसभरात येथून अनेक प्रवासी करतात. मात्र गेले काही दिवस या थांब्यावर लांबलचक पतंगाचे दुकान थाटण्यात आले आहे. चार रस्त्याच्या कोपऱ्यावर असणाऱ्या या थांब्यावर बेकायदेशीर पतंगाचे दुकान थाटले जाते आणि त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करते, हे आश्चर्य असल्याची प्रतिकिया या मार्गााने नियमित प्रवास करणाऱ्या स्वप्निल खोत यांनी व्यक्त केली. यावर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणीही येथील प्रवासी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेस्टच्या थांब्यावर अतिक्रमण केले असल्यास तातडीने कारवाई केली जाईल. याबाबतची प्रक्रिया सतत सुरू असते. मात्र बेस्टकडे अतिक्रमण हटवण्याचे अधिकार नसल्याने महापालिका यंत्रणेच्या मदतीने तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल.
-जयदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट प्रशासन

बेस्टच्या थांब्यावर अतिक्रमण केले असल्यास तातडीने कारवाई केली जाईल. याबाबतची प्रक्रिया सतत सुरू असते. मात्र बेस्टकडे अतिक्रमण हटवण्याचे अधिकार नसल्याने महापालिका यंत्रणेच्या मदतीने तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल.
-जयदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट प्रशासन