वाहतूक कोंडी ही मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अलिकडच्या काळात मेट्रोच्या कामांमुळे ही कोंडी आणखी वाढली आहे. अनेक ठिकाणी मेट्रोची कामं, रस्त्याची कामं, उड्डाणपूल आणि नाल्यांच्या कामांमुळे बऱ्याच महत्त्वाच्या रस्त्यांवर खोदकाम करून ठेवलं आहे, तर बहुतांश रस्ते, रस्त्यांवरील लेन बंद आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी वाढली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी मुंबईकर ऑफिससाठी ये-जा करतात तेव्हा लोकांना तासनतास रिक्षा-टॅक्सी किंवा बसमध्ये बसूनच राहावं लागत आहे. ५ ते १० किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतोय. त्यामुळे लोकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतोय. बऱ्याचदा मुंबईकर हा मनःस्ताप सोशल मीडियावर व्यक्त करतात. असाच एक प्रकार ऑनलाइन सेवा प्रदाता कंपनी लिंक्डइनवर पाहायला मिळाला आहे.

सीए असलेल्या गीतांजली खनी नावाच्या एका तरुणीने तिचा त्रागा लिंक्डिनवर मांडला आणि त्यावर शेकडो मुंबईकरांनी त्यांच्या मनातला भावनाही व्यक्त केल्या. वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास अनेकांनी गीतांजलीच्या पोस्टवरील कमेंट्सद्वारे व्यक्त केला. गीतांजलीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पुरे झालं आता! दररोज सकाळी प्रवास करताना होणाऱ्या त्रासाबद्दल यापुढे मी गप्प बसू शकत नाही. या शहरातली कधीही न थांबणारी बांधकामं आता आम्हाला वेड लावतील. यावर आता बोलावं लागेल.

Diwali celebrate in mumbai local video goes viral
मुंबईकरांचा नाद नाय! लोकलमध्ये साजरी केली जबरदस्त दिवाळी; प्रत्येक मुंबईकरानं पाहावा असा VIDEO
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Offensive video viral of female police sub inspector Nagpur news
महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
two women fight with steel pots beats each video
पाण्यासाठी एकमेकींना चक्क हंड्यांनी मारलं अन्… नळावरील भांडणाचा ‘हा’ मजेशीर Video पाहून पोट धरुन हसाल
two helpline numbers of transport department for complaints against travel companies fare hike is off
दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खासगी ट्रॅव्हल्सविरोधात तक्रारीसाठीचा क्रमांक बंद…
Viral Video Shows The young man got dizzy in the metro
VIRAL VIDEO : ‘आई कुणाचीही असो…’ मेट्रोमध्ये सगळ्यांनी केलं दुर्लक्ष पण महिलेच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सगळ्यांची मनं
Buddhist Dalit communitys displeasure is a challenge to Congress in Bhandara Constituency
बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
cute brother sister video
“माझ्या भावाला मारलंस ना तर…” चिमुकलीने आईशी कचाकचा भांडत दिली धमकी; VIDEO तील निरागसपणा पाहून युजर्स म्हणाले…

गीतांजलीने म्हटलं आहे की, दररोज सकाळी सूर्य उगवतो तसा माझा रक्तदाब वाढू लागतो. मी सकाळी ऑटोमध्ये बसते आणि कधीही न संपणाऱ्या ट्रॅफिकच्या रांगेत अडकते. मी वैतागते आणि विचार करते मी माझ्या ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचेन का? एकेकाळचे आमचे रस्ते आता बांधकामांनी गिळंकृत केले आहेत. खड्डे चुकवणं आणि कुठला रस्ता, कुठली गल्ली मोकळी आहे ते शोधणं असा कधीही न संपणारा खेळ सुरू असतो. आणि आवाजाबद्दल (ध्वनी प्रदूषणाबद्दल) काय बोलणार आपण? या त्रासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जॅकहॅमर्स, बुलडोझर आणि अवजड यंत्रसामग्रीमुळे होणाऱ्या, बधिर करणाऱ्या आवाजाने आपल्या कानांवर हल्ला होतो. आम्ही केवळ शांत सकाळची अपेक्षा करतोय, ही मागणी खूप मोठी आहे का?

गीतांजलीने म्हटलं आहे की, यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, या सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतोय. कामावर जाणं, मुलांना शाळेत सोडणं किंवा अगदी साधी-सोपी कामं करणंही कठीण झालं आहे. आपल्याकडची सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे वेळ, जो या सगळ्या गोष्टींमुळे वाया जातो. हा सगळा त्रागा केवळ आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल नाही. आपल्या सुरक्षेबद्दलही आहे. बांधकामांची क्षेत्रं ही अपघातांची मैदानं आहेत. लोकांना कल्पना न देता रस्त्यांची वळणं बदलणं, लेन बदलणं, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ट्रॅफिक या सगळ्याला तोंड देत रोजचा प्रवास सुरू आहे. ही आमची रोजची लढाई आहे, मला ज्याचा शेवट दिसत नाहीये!

गीतांजलीची मागणी काय?

“यातली गंमत म्हणजे ही सगळी सुरू असलेली बांधकामं शहराच्या विकासासाठी आहेत. पण हा विकास आपण कधी पाहणार आहोत? असं वाटतं की, आपल्याला याचा कधी लाभ मिळणारच नाही, तरीही आपण त्या विकासासाठी किंमत मोजतोय. गीतांजलीने मुंबईला उद्देशून म्हटलंय की, आम्हाला यापेक्षा काहीतरी चांगलं अपेक्षित आहे. आमचा आवाज ऐकला गेला पाहिजे. आणखी किती दिवस हा त्रास ‘रोजचाच’ समजून स्वीकारायचा. अधिकाऱ्यांनी या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे. बांधकाम योजना आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ठराविक कालमर्यादेची मागणी करुया.”

गीतांजलीने मुंबईकरांना आवाहन केलं आहे की, आता आपण याविरोधात आवाज उठवूया, बांधकमांमुळे सकाळी-संध्याकाळ जी वाहतूक कोंडी होतेय, मुंबईकरांना जो त्रास होतोय त्याविरोधात बोलूया. कारण आपण सुरक्षित प्रवासास पात्र आहोत.

“रिमोट वर्क, वर्क फ्रॉम होम सुविधेची आवश्यकता”

गीतांजलीच्या या पोस्टवर अनेक मुंबईकरांनी त्यांची मतं मांडली आहेत. थॉमस ऑलिव्हरा यांनी यावर कमेंट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, मुंबईतली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या अधिक संधी निर्माण करणं आवश्यक आहे. रिमोट वर्कच्या (दूरस्थ कामाच्या) पर्यायांना प्रोत्साहन द्यायला हवं. ज्यामुळे आपण आरोग्यदायी आणि संतुलित जीवन जगू शकतो. रस्त्यावरील गर्दी कमी करू शकतो आणि उत्पादकता वाढवू शकतो.

हे ही वाचा >> VIDEO: गोष्ट मुंबईची: भाग ११९ – ‘या’ ठिकाणी होती मुंबईतील सर्वात प्राचीन नागरवस्ती!

“पर्यायी शहरांमध्ये कंपन्यांचं स्थलांतर गरजेचं”

प्रसादराजे भोपळे यांनी यावर कमेंट केली आहे की, समस्या सरकारची नसून आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी मुंबई किंवा कोणत्याही मेगा सिटीकडे धाव घेण्याच्या मानसिकतेची आहे. जर तुम्हाला खरोखर ही समस्या सोडवायची असेल, तर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना, व्यापारी मित्रांना मुंबईत कार्यालय न उघडण्याचा सल्ला द्या. मुंबईजवळ उरण, पनवेल, नवी मुंबई ही जवळची ठिकाणं उत्तम पर्याय आहेत. त्याचबरोबर तुमच्या राजकारणात असणाऱ्या मित्रांना मुंबईत होणारं स्थलांतर रोखण्यासाठी धोरणं तयार करायला सांगा. मुंबईतच स्थायिक होण्याचा अट्ठाहास थांबवा. तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये काम करताय तिथल्या अधिकाऱ्यांकडे मागणी करा की, कर्मचाऱ्यांना विनाकारण मुंबईत यायला सांगू नका, त्यामुळे या सुंदर शहरावरचा बोजा वाढतोय. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या कंपन्यांना तुमच्या ऑफिसच्या वेळा बदलायला सांगा.