Mumbai Crime : मुंबईत एका सीए म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आणि गळफास लावून घेत आत्महत्या ( Mumbai Crime ) केली आहे. त्याने त्याच्या फेसबुक लाइव्हमध्ये हा आरोप केला आहे की त्याच्या होणाऱ्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबाने त्याला मारहाण केली होती आणि तिचा पाठलाग केल्याच्या प्रकरणात, तसंच छेड काढल्याच्या प्रकरणात तुला अडकवू असं सांगितलं होतं. तसंच १२ लाख ५० हजार रुपये माझ्याकडून उकळले होते. या सगळ्या ताणातून आयुष्य संपवत असल्याचं या माणसाने म्हटलं आहे.

काय घडली घटना?

मुंबईतल्या गोवंडी या ठिकाणी असलेल्या देवनार भागात ३३ वर्षीय सीए संदीप पासवान याने त्याचं आयुष्य ( Mumbai Crime ) संपवलं. संदीपने त्याचं आयुष्य संपवण्यापूर्वी फेसबुक लाइव्ह करत काय घडलं ते लोकांना सांगितलं होतं. संदीप पासवान म्हणाला होता की त्याच्या होणाऱ्या पत्नीकडून त्याची फसवणूक झाली आहे. तसंच तिच्या आई वडिलांनी माझ्यावर खोटे आरोप केले असंही संदीपने फेसबुक लाइव्ह करत सांगितलं. फेसबुक लाइव्ह पाहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांनाही माहिती दिली होती. मात्र पोलीस त्याच्या घरी पोहचले तोपर्यंत त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं ( Mumbai Crime ) होतं. १९ सप्टेंबरला ही घटना घडली. संदीप पासवान हा मूळचा झारखंडचा होता. तो गोवंडी या ठिकाणी भाडे तत्त्वावरच्या घरात वास्तव्य करत होता. त्याचं एका तरुणीशी लग्न ठरलं होतं, दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र तरुणीने १२ लाखांहून अधिक रक्कम आपल्याकडून उकळली. तिने आणि तिच्या आई वडिलांनी मारहाण केली, तसंच खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याची धमकी दिली असं संदीपने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; नागपूरच्या मोवाड गावातील घटना

पोलिसांनी या घटनेबाबत काय सांगितलं?

मुंबई पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार संदीप पासवान आणि त्याच्या होणाऱ्या बायकोशी आणि तिच्या कुटुंबाशी मागच्या एक ते दीड वर्षापासून वाद सुरु होता. यामुळे हा तरुण तणावात होता. तसंच पोलिसांकडून त्याचं काऊन्सलिंग सुरु होतं. पोलिसांनी त्याला जो पाठिंबा दिला त्याबाबत त्याने पोलिसांना एक मेसेज करुन त्यांचे आभार मानले होते. त्याने पोलिसांना हे वचन दिलं होतं की कुठलंही टोकाचं पाऊल तो उचलणार नाही. मात्र अखेर गळफास घेऊन त्याने आत्महत्या ( Mumbai Crime ) केली.

२०१८ मध्ये महिलेशी ओळख

संदीप पासवान आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीची ओळख २०१८ मध्ये झाले होती. संदीप फेब्रुवारी २०१८ मध्ये मुंबईत आला होता. ती महिला आणि संदीप यांची ओळखही २०१८ मध्ये झाली होती. तसंच २०२१ पासून या महिलेने आणि तिच्या कुटुंबाने संदीपकडून १२ लाख ५० हजार रुपये घेतले होते.