दक्षिण आफ्रिकेत आढळलेला करोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणू जगभरात पाय पसरत आहे. त्यातच त्याचा संसर्गाचा वेग आणि बदललेली जीवघेणी रचना यामुळे जगभरातून काळजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अनेक देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रासाठी नियोजन करण्याबाबत पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. याचाच भाग म्हणून सोमवारी (२९ नोव्हेंबर) मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यात ओमिक्रॉन विषाणूवरही चर्चेची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ओमिक्रॉन’ डेल्टापेक्षाही जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत सतर्कतेचे आदेश दिले. महत्वाचं म्हणजे करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राने पूर्वकाळजी घेत निर्बंध लावले आहेत. मुंबई पालिकेनेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती संकलित गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.

विषाणूच्या नव्या प्रकारामुळे परदेशी प्रवाशांसाठी नियमावली

उद्धव ठाकरे यांनी कोविडसंदर्भात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

Covid 19: ‘ओमिक्रॉन’ने जगभरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं असताना ICMR चं मोठं वक्तव्य

राज्यात कठोर नियमावली

  • सर्वत्र मुखपट्टी परिधान करणे आवश्यकच, मुखपट्टीशिवाय कोठेही फिरता येणार नाही, रुमालाला परवानगी नाही, तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड.
  • उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये लसीकरण झालेल्यांनाच मुखपट्टीसह प्रवेश.
  • खासगी बस, गाडय़ा, टॅक्सी, रिक्षा, ओला-उबरमध्ये लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश. नियमांचे उल्लंघन केल्यास चालक व प्रवाशास ५०० तर वाहनमालकास १० हजार रुपये दंड.
  • दुकाने, मॉल, कार्यालयात येणाऱ्यांनी मुखपट्टीचा वापर केला नसल्यास असे दुकानदार किंवा आस्थापनांना १० हजार रुपये दंड. संबंधित दुकान, मॉल, कार्यालयाला टाळे.
  • कार्यक्रम, समारंभ, संमेलन, नाटय़प्रयोग, क्रीडा सामने, दुकाने, मॉल, कार्यालयांत केवळ लसीकरण झालेल्यांनाच मुखपट्टीसह प्रवेश. प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक.
  • १८ वर्षांखालील मुलांना महाविद्यालयीन किंवा अन्य ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणास्तव लस न घेतलेल्यांसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक.
  • बंद सभागृहात ५० टक्के, तर खुल्या मैदानात २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी.
  • चित्रपटगृहे, नाटय़गृहे, मंगल कार्यालयांत क्षमतेच्या ५० टक्के लोकांना प्रवेश.
  • संस्था, कंपनीच्या कार्यालयाने नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड. संस्था बंदचीही कारवाई.

मुखपट्टीच आवश्यक , रुमाल गुंडाळल्यास दंड

यापुढे मुखपट्टी ही बंधनकारकच असेल. मुखपट्टीशिवाय कोठेही फिरता येणार नाही. मुखपट्टी न वापरणारे पोलीस समोर आल्यास तोंडाला रुमाल गुंडाळतात हे अनुभवास आल्याने यापुढे मुखपट्टीच आवश्यक असेल. तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड आकारला जाईल. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.

करोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील पंधरा दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. 

येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील पंधरा दिवसांतील आपल्या प्रवासाची माहिती द्यावी, तसेच  त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण काटेकोरपणे करावे असे निर्देश चहल यांनी संबंधित प्राधिकरणाला दिले.