मुंबई : राज्यातील महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गणेशोत्सवात दर्शन मोहीम राबवल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा कामाला लागत असून सोमवारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. अतिवृष्टीग्रस्त डोंगराळ भागातील गावांच्या पुनर्वसनाबाबत ठोस धोरण-योजनांचा महत्त्वाचा विषय चर्चेला येणार आहे.

 राज्यात पुढील काही महिन्यांत मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध महानगरपालिकांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदूत्वाच्या पुरस्काराचा मुद्दा तापवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने या काळात उत्सवाला महत्त्व दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  ठिकठिकाणच्या गणेश मंडळांना भेटी दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विविध गणेश मंडळांना भेट दिली. त्याकाळात मंत्रालयातील कारभार थंडावला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी सोमवारी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. एरवी मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी-बुधवारी होते. पण आठवडय़ाची सुरुवातच मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेऊन करण्यात येणार आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसह डोंगराळ भागातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील गावावरच दरड कोसळल्यास पुनर्वसनाचे ठोस धोरण-उपाययोजना ठरवण्याचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदतीविषयी एका योजनेचा विषयही मंत्रिमंडळासमोर येणार असल्याचे समजते.

Denial of urgent hearing on petition against Rashmi Shukla Appointment of Director General of Police Mumbai print news
रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार; पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीला राजकीय रंग देऊ नका, उच्च न्यायालयाची टिप्पणी
Exam delayed due to technical problem in Mumbai University Mumbai news
मुंबई विद्यापीठाचे ढिसाळ नियोजन, तांत्रिक अडचणींची मालिका; परीक्षेला…
Damage to ancient steps at Banganga Mumbai news
Video : बाणगंगा येथील पुरातन पायऱ्यांची पुन्हा दुर्दशा; कामाच्या दर्जावर स्थानिकांचे प्रश्नचिन्ह
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत