विजेत्यांना ऑस्ट्रेलियाला अध्ययन दौऱ्यावर जाण्याची संधी
‘युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज’चा इंग्रजी भाषा मूल्यांकन विभाग आणि ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासातर्फे शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता लघुपट निर्मात्यांकरिता स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्यांना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये अध्ययन दौऱ्यावर जाण्याची संधी मिळणार आहे.
यूटय़ूबच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या एका स्पर्धेद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांची निवड या अध्ययन दौऱ्याकरिता केली जाणार आहे. त्यासाठी सामाजिक उद्योजकता, सर्जनशील अ‍ॅनिमेशन, रोबोटिक्स आणि समुद्री विज्ञान या चारपैकी एका विषयावर तीन मिनिटांचा व्हिडीओ बनवून त्याला यूटय़ूबवर अपलोड करायचे आहे. त्याची लिंक शाळांनी आयोजकांकडे पाठवायची आहे. स्पर्धेची नोंदणी सुरू झाली असून व्हिडीओ १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या दरम्यान पाठवायचे आहेत.
या स्पधेतील विजेत्यांना ऑस्ट्रेलियामध्ये एक आठवडय़ाचा अध्ययन दौरा करायला मिळेल. त्यात प्रवासाचा, राहण्याचा खर्चही समाविष्ट असणार आहे. ऑस्ट्रेलियातील बॉण्ड, चार्ल्स डार्विन, कर्टिन आणि जेम्स कूक युनिव्हर्सिटी नॅशनल ऑस्ट्रेलियन बँक आणि क्रेडिला ही विद्यापीठे यात सहभागी असणार आहेत.
विद्यार्थ्यांना आणि शाळांकरिता व्हिडीओनिर्मितीवर सत्रे घेतली जाणार आहेत. २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही सत्रे भारतभर होतील. त्यात ऑस्ट्रेलियातील काही तज्ज्ञही सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. ६६६.ं2९.१ॠ/ या संकेतस्थळावर या स्पर्धेची माहिती विद्यार्थी-शिक्षकांना घेता येईल.

Story img Loader