कॅम्पा कोलाच्या अनधिकृत घरांवर पालिकेने केलेल्या कारवाईचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात येणार आहे. कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असून त्यावेळी पालिकेकडून भूमिका मांडताना संबंधित कारवाईबाबत माहिती दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने ३ जून रोजी कॅम्पा कोलाच्या रहिवाशांची कारवाई न करण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर पालिकेने अनधिकृत घरे रिकामी करण्याची नोटिस दिली. मात्र रहिवाशांनी त्याला दाद दिली नव्हती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कॅम्पाकोला रहिवाशांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यादरम्यान पालिकेकडून या कारवाईबाबतची माहिती व अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Story img Loader