गर्दीच्या ठिकाणी होणारे विनयभंग, छेडछाड, फेसबूक, व्टीटर, अश्लिल एसएमएसच्या माध्यमातून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाच्या विरोधात अनेक महिला लोकलज्जेस्तव तक्रारीच करीत नाहीत. परंतु, शहरातील महिलांच्या अशा प्रकारच्या छळाचे वास्तव समोर आणण्यासाठी मुंबई हॅरॅस मॅप तयार करण्याचा उपक्रम अक्षरा या स्वयंसेवी संस्थेने हाती घेतला आहे.
या मोहिमेचा प्रारंभ सामाजिक कार्यकर्त्यां नंदिता गांधी, अभिनेते राहूल बोस, आयटीतज्ज्ञ विजय मुखी यांच्या हस्ते गुरूवारी झाला.
अशा प्रक्रारच्या संकटांचा सामना करावा लागतो त्यांनी http://www.akshara.crowdmap.com   या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी. ऑनलाईन तक्रार शक्य नसेल तर ९९२०१०३१०३ या क्रमांकावर एसएमएस करूनही तक्रार दाखल करता येईल.

Story img Loader