जिल्हा रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग योद्धे सक्रिय होणार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कर्करोगाविरुद्धच्या लढय़ासाठी ‘महाराष्ट्र कर्करोग योद्धे’ (कॅन्सर वॉरियर) एकत्र आले असून राज्यातील २५ जिल्हा रुग्णालये आणि चार वैद्यकीय महाविद्यालये ही त्यांची युद्धभूमी बनली आहे. जीवन-मरणाच्या लढाईत कर्करुग्णांना वाचविण्यासाठी ५५ कॅन्सर तज्ज्ञ ‘योद्धे’ बनून लढणार आहेत. खरे तर ही लढाई सुरू झाली असून राज्याच्या आरोग्याच्या इतिहासात टाटा कर्करोग रुग्णालय आणि आरोग्य विभागाने सुरू केलेला हा उपक्रम हजारो कर्करुग्णांना जीवनदान देणारा ठरणार आहे.
कर्करुग्णांनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘आयसीएमआर’च्या अहवालानुसार देशात दर वर्षी दहा लाख नवीन कर्करुग्णांनाची नोंद करण्यात येते. पाच लाखांहून अधिक लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. वेगवेगळ्या कारणांमुळे ग्रामीण भागातही कर्करुग्णांची संख्या वाढत असताना त्यावर मात करण्यासाठी टाटा कॅन्सरचे प्राध्यापक पंकज चतुर्वेदी तसेच संचालक डॉ. राजन बडवे यांच्या पुढाकारातून ‘महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर’ही संकल्पना जन्माला आली. अर्थात आरोग्य विभागानेही यासाठी पुढाकार घेतला असून या योजनेत ५५ कर्करोग सर्जन व फिजिशियन्सनी सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करुग्णांवर उपचार करण्याचे मान्य केले आहे. जूनपासून पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत महिनाभरात बाह्य़रुग्ण विभागात १७१९ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १०२ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ६६ जणांवर शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
कर्करोगविषयक समाजात पुरेशी जागृती नसल्यामुळे बऱ्याच वेळा लक्षणे दिसूनही रुग्ण उपचार घेण्याचे टाळतात आणि शेवटच्या टप्प्यात उपचाराकडे वळतात. ही गोष्ट लक्षात घेऊन कर्करोग पहिल्या टप्प्यातच उघडकीस आल्यास रुग्णावर यशस्वी उपचार करणे शक्य होऊन कर्करोगाचा धोका टळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी सर्व जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम, वेळीच तपासणी, तात्काळ उपचारास सुरुवात असे वेगवेगळे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. परळच्या टाटा कर्करोग रुग्णालयातून प्रशिक्षित झालेले हे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स असून सध्या ते वेगवेगळ्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांनी जिल्हा रुग्णालयांमध्ये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सोलापूर, औरंगाबाद, सांगली आणि कोल्हापूर येथील महाविद्यालयांचा समावेश असून सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करुग्णांसाठी बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ५५ कर्करोग योद्धे सामील झाले असले तरी आगामी काळात हा ओघ वाढेल.
भविष्यात अत्याधुनिक उपचार यंत्रणा
महाराष्ट्रात पुरुषांमध्ये तोंड, फुप्फुस तसेच महिलांमध्ये सव्र्हायकल आणि स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. २०१६ मध्ये राज्यात सुमारे सव्वा लाख कर्करुग्णांची संख्या असून पुरुषांमधील तोंडाच्या व फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण हे सुमारे ३० टक्केतर महिलांमधील कर्करोगाचे प्रमाण हे ३५ टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळात कर्करोग रुग्णांना मुंबईत यावे लागू नये यासाठी महसूल विभागनिहाय टप्प्याटप्प्याने उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. तसेच टाटा कर्करोग रुग्णालय आणि आरोग्य विभागात करार करून खासगी सार्वजनिक भागीदारी निर्माण करण्याची योजना आहे.