मुंबई : कर्करोग रुग्णांना अधिकाधिक चांगले आणि त्यांच्याच परिसरात उपचार मिळावेत यासाठी राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चार जिल्हा रुग्णालयांमध्ये रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तर दोन जिल्ह्यांमधील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रांमुळे सहा जिल्ह्यातील रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचार मिळू शकतील. त्यामुळे मुंबई, पुणे यांसारख्या शहरातील रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होईल.

नागरिकांना घराजवळ कर्करोगावरील उपचार सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीकोनातून राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालये कर्करोगावर उपचार करण्यास सक्षम झाल्यास रुग्णांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही. त्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील चार जिल्हा रुग्णालयांमध्ये रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तर दोन जिल्ह्यांमध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र हे जालना, रत्नागिरी, बारामती व धाराशीव येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरू करण्यात येणार आहे, तर अमरावती व नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र उभारण्यात येणार आहे. रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र, रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र हे टर्न की तत्त्वावर उभारण्यात येईल.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच

हेही वाचा – मान्यवरांच्या हस्ते ‘लोकसत्ता दुर्गां’चा गौरव

हेही वाचा – maharashtra polls 2024 : भाजपच्या यादीनंतर बंडाचे वारे, महायुतीचा तिढा कायम असताना ९९ नावांची घोषणा

जालना, रत्नागिरी, बारामती व धाराशीव येथे रेडिएशन ऑनकॉलॉजी केंद्र तसेच अमरावती व नाशिक येथे रेडियोथेरेपी आणि डे केअर किमोथेरेपी केंद्र, कर्करोगावरील उपचार आणि काळजी पुरविणारे केंद्र उभारण्याचे काम केंद्र सरकारचा अंगिकृत उपक्रम आणि केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांचा उपक्रम असलेले हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पोरेशन लिमिटेड (एचएससीसी लिमिटेड) या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पोरेशन लिमिटेड (एचएससीसी लिमिटेड) ही कंपनी या सहा जिल्ह्यांमधील कर्करोग उपचारावरील केंद्रांचे बांधकाम सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर पूर्ण करून देणार आहे. या केंद्रांमुळे सहा जिल्ह्यातील रुग्णांना त्यांच्या घराजवळ उपचाराची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे मुंबई, पुणे यासारख्या शहरातील रुग्णालयांवर पडणारा ताण कमी होऊ शकेल.