राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी राज्यातील भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले. येत्या १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून कोणाकोणामध्ये लढत होईल, याचे चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना यांनी युती केली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी केली आहे.
मुंबई (जागा २)
रामदास कदम (शिवसेना)
भाई जगताप (काँग्रेस)
मनोज कोटक (भाजप)
नागपूर (जागा १)
गिरीश व्यास (भाजप)
अशोकसिंह चव्हाण (काँग्रेस)
कोल्हापूर (जागा १)
सतेज पाटील (काँग्रेस)
महादेव महाडिक (अपक्ष)
नगर (जागा १)
अरूण जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
शशिकांत गाडे (शिवसेना)
जयंत ससाणे (अपक्ष)
धुळे-नंदुरबार (जागा १)
अंबरीश पटेल (काँग्रेस)
गोपाळ केले (भाजप)
सोलापूर (जागा १)
दीपक साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रशांत परिचारक (शिवसेना)
दिलीप माने (अपक्ष)
अकोला-बुलढाणा (जागा १)
गोपीकिशन बजोरिया

Story img Loader