बारावीच्या पुनर्परीक्षा, खासगी आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज १९ जुलैपासून मागविण्यात येत आहेत. हे अर्ज यंदापासून ऑनलाइन भरून घेण्यात येणार आहेत. १९ ते २५ जुलैदरम्यान या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज करता येतील. तर २६ ते ३१ जुलैदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसंदर्भातील माहिती सीडी व पत्राद्वारे संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्याना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही माहिती ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या त्या त्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळातून उपलब्ध होईल, असे सचिवांनी सांगितले.