मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही चटका लावून गेली. सचिनशिवाय क्रिकेटचा विचारच करू शकत नाही, या शब्दांत त्यांनी सचिनच्या निवृत्तीबद्दल आपली भावना व्यक्त केली. 
७१ व्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी आपल्या झनक बंगल्यावर शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना सचिनच्या निवृत्तीबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन यानीही हळहळ व्यक्त केली. ते म्हणाले, सचिनच्या निवृत्तीची बातमी समजल्यावर थोडा वेळ संपूर्ण देशाचे ह्रदय थांबल्याची भावना मनामध्ये निर्माण झाली. भारतीय क्रिकेटचे ह्रदय कायमचे थांबल्याचे मला वाटले. खरंच, त्याच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. सचिन हा देशाच्या गुणवत्तेचा प्रतीक बनला आहे. त्याच्याशिवाय क्रिकेटचा विचारच करू शकत नाही. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप शुभेच्छा!

Story img Loader