वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणा-या एका नाल्यावरील पुलावरून आज (सोमवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास एक कार नाल्यात पडली. या अपघातामध्ये कुणाल पराख्रम (२८) हा कारचालक मृत्यूमुखी पडला असून तो बोरीवली येथे राहणार होता.

पोलिसांना कारचालकाला आणि अपघातग्रस्त कारला बाहेर काढण्यात यश आलं असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Story img Loader