लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: चेंबूर येथे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भरधाव वेगात आलेली मोटारगाडी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांब्यावर धडकली. या अपघातात दोन महिलांसह पाचजण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले

सांताक्रूझ येथून निघालेली एक एर्टीगा मोटारगाडी शनिवारी मध्यरात्रीनंतर ठाण्याच्या दिशेला जात होती. भरधाव वेगात आलेली मोटारगाडी टिळकनगर उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. या भीषण अपघातात मोटारगाडीचे प्रचंड नुकसान झाले. टिळकनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने गाडीत अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

आणखी वाचा-मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत तोकड्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेवर परिणाम

अपघातातनंतर या परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी वेळीच अपघातग्रस्त गाडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत टिळकनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader