पावसाळा काही दिवसांवर, तरी रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत

Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
Nitin Raut Car Accident nagpur Maharashtra Assembly Election 2024
काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात
traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बोरिवलीमध्ये रस्त्यांची कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. कामातील संथगतीमुळे येत्या ३१ तारखेपर्यंत ती पूर्ण होण्याची शक्यता धूसर बनू लागली आहे. परिणामी या परिसरातील रहिवाशांना आपली वाहने खोदलेल्या रस्त्यावर टाकलेल्या खडीवरच उभी करायला सुरुवात केली आहे. मात्र रस्त्याखालील पोकळीमुळे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एक-दीड फूट खड्डय़ात गेलेली वाहने बाहेर काढण्यासाठी वाहनमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर आर्थिक भरुदडही सोसावा लागत आहे. रस्तेकामातील या कुचराईबाबत बोरिवलीमधील रहिवाशांमध्ये असंतोष पसरू लागला आहे.

बोरिवलीमधील शांतीवन परिसरात सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. मधील रस्ता सिमेंट काँक्रीटचा आणि बाजूला डांबरी रस्ताबांधणीचे काम करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शांतीवन परिसरातील पार्क व्ह्य़ू हॉटेलजवळील रस्ता खोदण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अन्य मर्गाने वळविण्यात आली होती. आता रस्त्याच्या मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र पदपथालगतच्या डांबरी रस्त्याचे काम अद्यापही झालेले नसून तो खोदून ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीपासून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे सपाटीकरण करून कंत्राटदाराने त्यावर खडी टाकली आहे.

रस्ता खोदल्यामुळे येथील सोसायटय़ांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना आपली वाहने घरापर्यंत आणणे अवघड बनले होते. आता सिमेंट काँक्रीटचा मधील भाग पूर्ण झाल्यामुळे इमारतीपर्यंत गाडी येते, पण रस्त्याचा डांबरी भाग अद्याप अपूर्णावस्थेत असल्याने सोसायटीच्या आवारात गाडी आणणे अवघड बनले आहे. वाहने उभी करण्यास जागा मिळत नसल्यामुळे काही गाडीमालक हैराण झाले आहेत. डांबरीकरणासाठी खोदलेल्या रस्त्यात टाकलेल्या खडीवरच त्यांनी आपली वाहने उभी करायला सुरुवात केली. मात्र रस्त्याचे सपाटीकरण योग्य पद्धतीने न झाल्यामुळे गाडी उभी केलेल्या जागी रात्रभरात एक ते दीड फूट खोल खड्डा झाला आणि त्यात गाडय़ा अडकल्या. गाडी खड्डय़ात अडकल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीमालकांची धावपळ उडाली. धावतपळत जाऊन त्यांनी मिनतवाऱ्या करून टोइंग व्हॅनची व्यवस्था केली. टोइंग व्हॅनवरील क्रेनच्या साह्य़ाने खड्डय़ात अडकलेल्या गाडय़ा बाहेर काढण्यात आल्या. एक गाडी खड्डय़ातून बाहेर काढण्यासाठी मालकाला १५०० रुपये मोजावे लागले.

पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप रस्त्याची कामे पूर्ण झालेली नाहीत. आता कंत्राटदार धावतपळत ती पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत. शांतीवनातील या रस्त्याचे सपाटीकरण योग्य पद्धतीने न झाल्यामुळे खाली पोकळी राहिली असावी आणि त्यामुळेच गाडय़ांच्या वजनामुळे तेथे खड्डा पडला असावा, अशी शंका रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामावर पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. डांबरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याखालील पोकळीमुळे भविष्यात हा रस्ता खचून नव्या समस्येला तोंड देण्याची वेळ ओढवेल, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

खोदकाम केलेल्या कंत्राटदाराने या रस्त्याभोवती बॅरिकेड लावलेले नाहीत. त्यामुळे अनेक गाडीचालक आपली वाहने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर उभी करत आहेत. कंत्राटदाराने बॅरिकेड लावून हा रस्ता बंदिस्त केला असता तर वाहने उभी करता आली नसती. मात्र वाहने उभी केल्यामुळे रस्त्याखाली पोकळी असल्याचे निदर्शनास आले आहे. आता तरी कंत्राटदाराने रस्त्याखाली असलेल्या पोकळी विचारात घेऊन कामे करावी, अशी मागणी या विभागातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.