मुंबई : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपायांची चाचपणी सुरू केली आहे. बाहेरून शहरात येणाऱ्या वाहनांमुळे शहरात धूळ येऊ नये, यासाठी गाडय़ांची चाके धुण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. त्यासाठी सर्व प्रवेशद्वारांवर ‘वॉटर जेट स्प्रे मशीन’ बसवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरूवारी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राम, सीता देशातील सर्व नागरिकांचे दैवत! ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

मुंबईतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्यामुळे प्रशासन कामाला लागले असून प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायांची चाचपणी केली जात आहे. अन्य शहरांतून येणाऱ्या वाहनांच्या चाकांवाटे मुंबईत मोठय़ा प्रमाणात धूळ येते. त्यामुळे आता शहरात प्रवेश करण्यापूर्वी ही चाके पाण्याचा वेगाने मारा करून धुतली जातील. त्यासाठी गाडय़ा थांबवण्याची गरज भासणार नाही. चालत्या गाडय़ांच्या चाकांवरच पाणी फवारले जाईल, असे चहल यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे धूळ कमी करण्यासाठी दररोज ६५० किमी रस्ते धुण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कचराभूमीवर कचरा जाळण्याच्या घटना घडू नयेत म्हणून सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. कृत्रिम पावसाचा प्रयोग : हवेतील धूळ खाली बसावी, म्हणून मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोगही केला जाऊ शकतो. दिल्लीमध्ये ‘क्लाऊड सिडिंग’ होणार असून त्याला यश आल्यास मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडण्याची चाचपणी केली जाईल, असे चहल यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही महापालिकेने धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग अनेकदा केला आहे. मात्र हे सर्व प्रयोग फसले होते. पैशाचा अपव्यय झाल्याची टीकाही महापालिकेला सहन करावी लागली. असे असताना आता शहरावर कृत्रिम पाऊस पाडण्याचा घाट घातला जाण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car wheels clean before enter to mumbai bmc new experiment to reduce pollution zws
Show comments