दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची नेमकी दिशा मिळावी, या हेतूने दै. ‘लोकसत्ता’मध्ये येत्या सोमवारपासून ‘दहावीनंतर काय?’ हे मार्गदर्शनपर सदर सुरू करण्यात येत आहे. या सदरात दहावीनंतर करता येणारे पदवी – पदविका अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती देण्यात येईल. यात प्रत्येक दिवशी एकेका क्षेत्रासंबंधीचे अभ्यासक्रम, अर्हता, अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक संस्थांची माहिती, प्रवेशप्रक्रिया तसेच प्रवेशपरीक्षांसंबंधीच्या अद्ययावत माहितीचा समावेश असेल. पुढील ६० दिवस सुरू राहणारे हे सदर पालक-विद्यार्थ्यांची करिअरच्या निवडीविषयीची संभ्रमावस्था कमी करायला मदत करतीलच, त्याचसोबत करिअरसंबंधातील अचूक आणि अद्ययावत माहितीही मिळणार आहे. करिअरच्या नवनव्या पर्यायांची सविस्तर ओळख करून देणाऱ्या या माहितीमुळे पालक-विद्यार्थ्यांना करिअरची निवड करण्यास निश्चितच मदत होईल.

Story img Loader