मुंबई : कारोना महामारीमुळे स्थगित करण्यात आलेल्या गोवा कार्निव्हलचे यंदा १८ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून गोव्यातील नागरिक कार्निव्हलच्या तयारीला लागले आहेत. तसेच महोत्सवाची घोषणा होताच अनेक पर्यटकांनीही गोव्याला जाण्याचे बेत आखले आहेत. गोवा कार्निव्हलनिमित्त पणजी (१८ फेब्रुवारी), मडगाव (१९ फेब्रुवारी), म्हापसा (२० फेब्रुवारी) आणि वास्को (२१ फेब्रुवारी) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गोवाच्या परंपरेनुसार किंग मोमो आणि त्याची पत्नी या कर्निव्हलचे अध्यक्षस्थान भूषवित असून यंदा किंग मोमो होण्याचा मान उद्योजक रसेल डिसूझा यांना मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>मुंबई: महिलांच्या आरोग्यासाठी राज्य सरकार राबविणार विशेष मोहीम

करोनाकाळानंतर दोन वर्षांनी गोव्यामध्ये होऊ घातलेल्या गोवा कर्निव्हलची माहिती देण्यासाठी अंधेरीमधील रेडिसिन ब्ल्यू मुंबई इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खौंटे, पर्यटन संचालक निखील देसाई, यंदाचे किंग मोमो रसेल डिसूझा यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा! गोदरेज कंपनीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

गोव्यातील नापा अंतराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले असून देश-विदेशातील सुमारे ६० ते ७० हजार पर्यटक हवाई मार्गे या कार्निव्हलसाठी गोव्यात दाखल होतील असा अंदाज गोवाचे पर्यटन संचालक निखील देसाई यांनी व्यक्त केला. तसेच यावर्षी येणाऱ्या पर्यटकांसाठी गोवा कॅबची खास सोय करण्यात आली आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी मद्यपान करण्यास आणि जेवण बनवण्यास बंदी करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. पर्यटकांसाठी २४ तास हेल्पलाईन कार्यान्वित राहणार आहे. कोणत्याही अनधिकृत संकेतस्थळावरून गोव्यातील हॉटेल आणि खासगी गाड्यांसाठी आरक्षण करून आपली फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन निखिल देसाई यांनी केले आहे.

हेही वाचा >>>मुंबई: नोकरदार महिलांसाठी मुंबईत सात ठिकाणी वसतिगृहे

करोनाकाळात अनेक नागरिक घरी बसून कार्यालयीन काम करीत होते. आजही अनेक मंडळी घरातूनच कार्यालयीन काम करीत आहेत. अशा मंडळींना गोवा कर्निव्हल महोत्सवाचा आनंद लुटत यावा यासाठी खास सोय करण्यात आली आहेत. पर्यटकांना महोत्सवाचा आनंद लुटतानाच समुद्रकिनाऱ्यावर बसून कार्यालयीन काम करता येणार आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकांना केवळ समुद्रकिनाऱ्यांवरच नव्हे तर अन्य ऐतिहासिक ठिकाणी फिरता येईल. गोव्यातील जुनी मंदिरे, पुरातन वारसा वास्तू, शिल्प आदी पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे, असे गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी सांगितले.