निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळ प्रकल्पातील विक्री करावयाचे चटईक्षेत्रफळ अखेर निविदा काढून विकण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या निविदेत सर्वाधिक बोली लावणाऱ्या विकासकाला हे चटईक्षेत्रफळ विकले जाणार आहे. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून वरळीसह नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी पुनर्विकास पूर्ण केला जाणार आहे.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
airship replace aircarft
‘एअरशिप्स’ घेणार विमानांची जागा? याचा अर्थ काय? भविष्यात एअरशिप्सचा कसा फायदा होणार?
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

बीडीडी चाळ पुनर्विकास हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. सत्तांतर झाले आणि वरळी येथील प्रकल्पात सुधारणा सुचविण्यात आल्याने प्रत्यक्षात प्रकल्पाला सुरुवात होऊ शकली नाही. त्यामुळे खर्चही वाढला. जून २०२२ पर्यंत ४२ हजार कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. पुनर्वसनातील इमारतींसाठी १९ हजार १९८ कोटी आवश्यक असून म्हाडाची तेवढी आर्थिक क्षमता नसल्यामुळे चटईक्षेत्रफळ विक्रीचा प्रस्ताव म्हाडाच्या लेखाधिकाऱ्यांनी मांडला. मात्र फक्त वरळी येथील चटईक्षेत्रफळाची खुल्या बाजारात निविदेद्वारे विक्री करण्याचे ठरविण्यात आले आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या वरळी येथील खुल्या बाजारात विक्री करावयाचे बांधकाम अचानक थांबविण्यात आले आहे.

आणखी वाचा-बेस्ट कामगार आंदोलनामुळे ९२१ बस आगारातच उभ्या, सलग दोन दिवस मुंबईकरांचे हाल

बीडीडी चाळींच्या प्रकल्पात पुनर्विकासातील इमारती उभारण्यासाठी वरळी (११ हजार ६३२ कोटी), नायगाव (२२९५ कोटी ) आणि ना. म. जोशी मार्ग (२२७८ कोटी) असा एकूण १६ हजार २०६ कोटी खर्च अपेक्षित आहे. विक्री करावयाच्या इमारती बांधण्यासाठी वरळी (१३ हजार ७१० कोटी), नायगाव (३१७० कोटी) आणि ना. म. जोशी मार्ग (२३१७ कोटी) असा १९ हजार ४०४ कोटी खर्च येणार आहे. त्याऐवजी खुल्या बाजारात चटईक्षेत्रफळ विकले तर वरळी (१६ हजार २०६), नायगाव (पाच हजार ६९२ कोटी) आणि ना. म. जोशी मार्ग (३४८८ कोटी) असे २५ हजार ७७२ कोटी रुपये मिळू शकतात. यासाठी प्रति चौरस मीटरचा दर अडीच लाख रुपये गृहित धरण्यात आला आहे. म्हाडाच्या लेखा अधिकाऱ्यांनीच हे टिपण तयार केले आहे. यापैकी फक्त वरळी प्रकल्पातील चटईक्षेत्रफळ विकले तर १६ हजार ५९२ कोटी रुपये मिळू शकतात. त्यामुळे तिन्ही ठिकाणी पुनर्वसनातील इमारतींचे काम पूर्ण करता येईल. याशिवाय नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील घरे खुल्या बाजारात विकून म्हाडाला फायदा कमावता येईल, असा दावा करण्यात आला आहे.