व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून राजकीय फटकारे ओढले आहेत. जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ट्विटरच्या माध्यमातून व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा देतानाही त्यांनी आपला खास अंदाज कायम राखला आहे.
व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज #जागतिकव्यंगचित्रकारदिन ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका. pic.twitter.com/WcUQYvt0Cl
— Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2019
आज जागतिक व्यंगचित्रकार दिन ह्या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका, असे राज यांनी ट्विट केले आहे. लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत राज्यभरातील सभांद्वारे राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारवर आपल्या खास शैलीत सातत्याने टीका केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे राज हे देखील उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत. आपल्या कुंचल्यातून ते नियमितपणे राजकीय भाष्य करत असतात. त्यांनी या ट्विटसोबत व्यंगचित्र रेखाटतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. तसेच देशाला तुमच्या प्रतिभेची आज सगळ्यात जास्त गरज आहे, असे व्यंगचित्रकारांना उद्देशून म्हटले आहे.