ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मनोहर साळवी, मिलींद पाटील यांच्यासह अन्य दोन जणांविरोधात एका टीव्ही केबल कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापि कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
नगरसेवक मनोहर साळवी, मिलींद पाटील तसेच सुमीत गायकर आणि मनोज सावंत या चौघांनी स्कॉड-१८ या केबल टीव्ही कंपनीकडून शिवसाई केबल कंपनीमार्फत तीन हजारांपेक्षा जास्त सेट टॉप बॉक्स घेतले होते. मात्र, या सेट टॉप बॉक्सकरिता त्यांनी ६९ लाख १२ हजार रुपये स्कॉड-१८ कंपनीला दिले नव्हते. त्यामुळे या रकमेचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप करत कंपनीचे संचालक गणेश गोविंद नायडू यांनी कळवा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, कळवा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून तो राबोडी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे, अशी माहिती राबोडी पोलिसांनी दिली.

Story img Loader