मुंबई : नोकरी सोडल्यानंतर कपड्याचे डिझाइन चोरल्याच्या संशयावरून अपहरण करून शिंप्याकडे एक लाख रुपये खंडणीची मागणी केल्याच्या आरोपाखाली तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी हातोडी, बांबू व पट्ट्याने तक्रारदाराला मारहाण केली व त्यानंतर त्याच्याकडील मोबाइल व रोख रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार मोहम्मद शहाबुद्दीन शहादत अली अन्सारी (३७) व्यवसायाने शिंपी असून तो चारकोप इंडस्ट्रीयल इस्टेट येथे कामाला होता. अन्सारी बुधवारी ८ च्या सुमारास कंपनीतून बाहेर पडला. त्यावेळी आरोपी सुनील ऊर्फ सॅम विकास दास व त्याचासोबत असलेल्या तीन साथीदारांनी त्याला अडवले व जबरदस्तीने रिक्षात बसवण्यात सांगितले. त्यानंतर चालत्या रिक्षामध्ये तक्रारदाराला मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल व रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर तक्रारदाराला रिक्षातून मालवणी परिसरात नेण्यात आले.

हे ही वाचा… Badlapur Sexual Assault : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, शाळेच्या दोन विश्वस्तांबाबत एसआयटीने दिली ‘ही’ माहिती

तेथे त्याला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. शेरवानीचे डिझाईन चोरल्याबद्दल त्याच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ती रक्कम दिल्यानतंर सोडू असे धमकावण्यात आले. यावेळी तक्रारदाराला हातोडी, बांबू व कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यात आली. तेथून सुटका झाल्यानंतर तक्रारदाने शताब्दी रुग्णालयात उपचार घेतले व घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगितला. तक्रारदार हा मुख्य आरोपी सुनील याच्याकडे शिवणकाम करायचा. तेथील नोकरी सोडल्यावर त्याने शेरवानीचे डिझाईन चोरल्याचा सुनीलला संशय होता. सुनीलसह त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against three in mumbai for kidnapping tailor and demonding 1 lakh and suspecting him stealing garment design mumbai print news sud 02