लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : ठाण्यातील रहिवाशाचे घर बेकायदेशिररित्या विकल्याच्या आरोपाखाली खेरवाडी पोलिसांनी म्हाडाच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला.

Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
Rhona Wilson
रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना जामीन; शहरी नक्षलवाद प्रकरण
Businessman arrested for demanding Rs 70 lakh ransom Pune print news
व्यावसायिकाकडे ७० लाखांची खंडणी मागणारा गजाआड; कामावरून काढल्याने कामगाराकडून खंडणीची मागणी
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
15 year old accused stealed Rs 32 000 and mobile from 80 year old man
पुणे : ज्येष्ठ नागरिकाचे हात पाय बांधत चोरी करणाऱ्या अल्पवयीन केअर टेकरला १२ तासात अटक

तक्रारदार चंद्रकांत साळुंखे (४३) हे ठाणे येथील रहिवासी आहेत. १९७६ मध्ये त्यांना म्हाडाच्या वतीने ठाण्यात घर वितरीत झाले होते. १९९८ मध्ये साळुंखे दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. त्यावेळी त्यांनी खोली काहीकाळ भाडे तत्त्वावर दिली. पुढे बराच काळ त्या खोलीत कोणी राहत नव्हते. त्याच सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या सूनने सासऱ्यांच्या सूचनेवरून त्या खोलीवर बेकायदा ताबा घेतला. तसेच स्वतःच्या नावावर नोंदवून खोलीची विक्री केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आणखी वाचा-रिझर्व बँक स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी, ई-मेलमध्ये रशियन भाषेचाही वापर

साळुंखे यांनी मुलाच्या मदतीने तपासणी केली असता याप्रकरणी बनावट कागदपत्र बनवण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली. न्यायलयाच्या निर्देशानुसार याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader