लोकमान्यनगर भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रदीप खाडे आणि त्यांच्या मेव्हण्यास पाचजणांच्या टोळक्याने रविवारी रात्री मारहाण करून त्यांच्याकडील तीन लाखांचे सोन्याचे दागिने लुटले.
खाडे यांची पत्नी प्राजक्ता खाडे या विद्यमान नगरसेविका असून त्या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता, या टोळक्याने त्यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गणेश उर्फ काळ्या, बिपीन, कमलेश उत्तेकर, समीर उर्फ कमू जावेद नाईक आणि सुभोजित बाग या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी समीरला अटक करण्यात आली असून उर्वरीत चौघांचा पोलीस शोध घेत आहेत.     

Story img Loader