मुंबई: दि महाराष्ट्र मंत्रालय क्रेडिट को. ऑप सोसायटी फसवणुकीप्रकरणी २६ जणांविरूद्ध मरिन ड्राईव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी तत्कालीन संचालक मंडळाशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. बायोमेट्रीक हजेरीत हेराफेरी करत ६३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
डोंबिवलीचे रहिवासी असलेले सनदी लेखापाल मोहन शंकर मोहिते (६२) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात अला असून पोलीस अधिक तपास करीत आहे. आरोपानुसार, १ एप्रिल २०२२ ते २५ जुलै २०२२ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा… मुंबई : बनावट तिकीट तयार करणाऱ्याला अटक, ३३ लाखांची बनावट ई-तिकिटे जप्त
या सहकारी संस्थेत कार्यरत असलेले तत्कालीन संचालक मंडळ आणि अन्य आरोपीनी मिळून संस्थेच्या बायोमेट्रिक हजेरी यंत्रामध्ये बनावट नोंदी केल्या. त्याबाबदल जास्तीचा कामकाज भत्ता घेत ६३ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार एकूण २६ जणांविरुद्ध मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.