मुंबई : कथित ध्वनिफीत प्रसारीत करून बदनामी केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात आठ जणांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बदनामी करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, असे आरोप केरे पाटील यांनी तक्रारीत केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : चंद्रकांत पाटील करणार अजितदादांचा ‘हिशोब’ चुकता

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय रमेश केरे यांनी १६ ऑक्टोबरलाा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रमेश केरे हे मराठा क्रांती मोर्चासाठी मोठा निधी गोळा करून अपहार केल्याची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. रमेश केरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. संबधीत ध्वनीफीतीत बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : सणासुदीच्या अगोदर राज्य सरकारकडून करोना संसर्गवाढीचा सूचक इशारा!

समाज माध्यमांवर खोटी प्रसारीत करून बदनामी केल्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा रमेश केरे यांनी गंभीर आरोप केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.मागील काही दिवसांपासून एक ध्वनीफीत समाज माध्यमांवर प्रसारीत झाली होती. त्यानंतर रमेश केरे यांनी फेसबुकवर लाईव्ह करून उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला असा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against eight people on complaint of ramesh kere maratha kranti morcha sucide mumbai print news tmb 01