मुंबई : दादर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या आरोपाखाली आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणात आता दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दादर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. पहिल्या गुन्ह्यात महेश सावंत यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरा गुन्हा आमदार सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे आणि इतर कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी संघर्ष टळला, मात्र शनिवारी पुन्हा या वादाचे पडसाद उमटले होते. प्रभादेवीत शनिवारी रात्री शिंदे गट आणि शिवसैनिक समोरासमोर आले. त्यावेळी सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात मारामारी झाला. पोलीस ठाण्यात आले असता सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण करण्यात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभादेवीत झालेल्या प्रकरणाबाबत समाज माध्यमांवरील संदेशाचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक त्या ठिकाणी पोहचले होते. त्यातून हा वाद झाला.

हेही वाचा : “…अन् पोलीस अधिकारीही भयभयीत झाले” प्रभादेवी प्रकरणावर शिवसेना नेते सुनील शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

ठाकरे गटातील ५ जणांची जामिनावर सुटका

अटक केलेल्या पाच शिवसैनिकांवरील कलम भादंवि ३९५ (जबरी चोरी) मागे घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते आहे. दरम्यान या पाच जणांना जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. ते सर्व दादर पोलीस ठाण्यातून बाहेर पडले असून मातोश्रीवर गेले असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against mla sada saravankar in allegation firing dadar police station in mumbai print news tmb 01