लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कुर्ला बस अपघातातील मृतांपैकी एका महिलेच्या अंगावरील दागिने चोरी झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता. एक हेल्मेट घातलेली व्यक्ती मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या चोरत असल्याचे चित्रीकरण प्रसारित झाले आहे. सध्या ती ध्वनिचित्रफीत चर्चेचा विषय ठरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Thief arrested, Thief arrested for stealing in Mumbai,
साधकाच्या वेशात चोरी करणारा चोरटा गजाआड; पुणे, पिंपरीसह मुंबईत वाईत चोरीचे गुन्हे
tires of seized cars stolen pune
पुणे : चतु:शृंगी पोलिसांनी जप्त केलेल्या मोटारींचे टायर चोरीला, पोलीस ठाण्याच्या आवारात चोरी झाल्याने खळबळ
Bibvewadi school girl murder, girl murder,
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष
allu arjun case filled
अल्लू अर्जुनवर का झाला गुन्हा दाखल? प्रीमियरदरम्यान महिलेच्या मृत्यूचं प्रकरण काय आहे?
Elderly man murdered
Crime News : लग्नाचे आश्वासन, सोन्याचे दागिने अन्… ७२ वर्षांच्या वृद्धाबरोबर रायगडमध्ये काय घडले? मुंबईतील जोडप्याला हत्येच्या आरोपाखाली अटक

कन्नीस अन्सारी(५५) यांचा कुर्ला बेस्ट बस अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या हातातील बांगड्या काढणाऱ्या एका व्यक्तीची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे.

आणखी वाचा-कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या

अन्सारी यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. त्यांच्या मृतदेहजवल निळ्या रंगाचे हेल्मेट घातलेली एक व्यक्ती आणि त्याचा सहकारी असे दोघे जण आले. त्या दोघांनी अन्सारी यांच्या मृतदेहाच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. त्याचवेळी तेथे मदत कार्यासाठी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचे चित्रीकरण केले. ती चित्रफीत प्रसारित झाली. बांगड्या चोरणाऱ्या चोरट्यांच्या कृतीबाबत संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनीही याप्रकरणाची दखल घेऊन अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३, ३१५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मोबाइल व सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे. कुटुंबियांकडूनही याबाबतची माहिती घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती

कुर्ला बेस्ट बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. कुणी आपली लेक गमावली तर कोणी आपले आई-वडील. याच अपघातात जखमी झालेले ४२ जण जीवनाचा पुढचा संघर्ष कसा करायचा या विवंचनेत आहेत. सध्या या बस अपघाताचा तपास कुर्ला पोलीस करत असून त्या तपासात काय समोर येते? हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, अशातच एका मृत महिलेच्या हातातील बांगड्या चोरी करतानाची चित्रफीत चर्चेत आल्याने अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत.

Story img Loader