आपल्या बदलीसाठी ९० लाख रुपयांची रक्कम घेऊन निघालेल्या रेल्वे बोर्डाचे सदस्य महेश कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी सायंकाळी अटक केली. ही रक्कम आपण रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचा पुतण्या विजय सिंगला याला देण्यासाठी नेत होतो, असा जबाब त्यांनी ‘सीबीआय’समोर दिला.
महेशकुमार हे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक होते. त्यांची नुकतीच रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली. गुरुवारी त्यांनी पदाचा कार्यभारही स्वीकारला. पण त्यांना ही नेमणूक नको होतो. आपली बदली व्हावी यासाठी ते ९० लाख रुपयांची लाच घेऊन निघाले असता, ‘सीबीआय’ने त्यांना अटक केली. ही रक्कम आपण रेल्वेमंत्र्यांचा पुतण्या विजय सिंगला यास देण्यासाठी निघालो होतो, असे त्यांनी अटकेनंतर सांगितले.