शीना बोरा हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्याच्या काही तासांनंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) इंद्राणी मुखर्जीचे पती पीटर मुखर्जी यांना अटक केली आहे. पीटर मुखर्जी यांना इंद्राणीने शीनाची हत्या केल्याची कल्पना तिला अटक होण्यापूर्वीपासूनच होती, असा दावा सीबीआयने केला आहे. त्यामुळे या हत्याप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, गुन्हेगारी दंडसंहितेनुसार अटक केल्यानंतर ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. त्यानुसार सीबीआयने आज १५० साक्षीदारांच्या जबाबाचा समावेश असलेले तब्बल एक हजार पानी आरोपपत्र दाखल केले आणि ते दाखल केल्याच्या काही तासांत सीबीआयने पीटर मुखर्जी यांना अटक केली आहे. ही या हत्येप्रकरणातील चौथी अटक आहे. इंद्राणी मुखर्जी, तिचे दुसरे पती संजीव खन्ना आणि तिचा वाहनचालक श्याम राय हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

पेणजवळील गागोदे खुर्दच्या जंगलात मिळालेले मानवी अवशेष हे शीना बोराचेच असल्याचा अहवाल दिल्लीतील एम्समधील न्यायवैद्यक विभागाने आजच दिला आहे. गागोदे खुर्दमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचे नमुने घेण्यात आले होते. त्यावरील चाचण्यांनंतर हे अवशेष शीना बोराचेच असल्याचा अहवाल सीबीआयकडे देण्यात आला आहे.