राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानी आज ईडीकडून छापेमारी सुरू आहे. यावरून भाजापाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, काही दिवसांत अनिल देशमुख यांना अटक होईल, असं भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. एवढच नाही तर अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचं ते म्हणाले आहेत. किरीट सोमय्या यांनी पत्रकारपरिषद घेत यावरून जोरादार टीका केली. तसेच, अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी देखील किरीट सोमय्यांनी केली आहे. या पत्रकारपरिषदेस भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंची देखील उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पत्रकारपरिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ”अनिल परब नंतर मिलिंद नार्वेकरांना परब यांना पण त्याच वाटेवर जावं लागणार आहे. मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडं कापली.आज त्या जागेची किंमत १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचं बांधकाम सुरू आहे आणि बहुतेक त्याला मार्गदर्शन पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचं आहे. कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलली नाही. अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जात असतात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात, आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात.”
काही दिवसांनी अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी होणार – किरीट सोमय्या
”एवढं झाल्यानंतरही काही कारवाई नाही आणि हा बंगला केव्हा लॉकडाउनच्या काळात उद्धव ठाकरेंचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते आणइ उद्धव ठाकरेंचे डावे हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगला बांधत होते. शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे.” असा देखील आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
माजी खासदार श्री. किरीट सोमैया यांची पत्रकार परिषद. https://t.co/fw1IFY8bQB
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 25, 2021
तसेच, ”अरबी समुद्राचा पश्चिम किनारा, कोकणच्या बाजूचं मुरूड म्हणजे दापोली मुरूड तिथं अनिल परब व मिलिंद नार्वेकर आणि अलिबागकडचं मुरूड तिथं उद्धव ठाकरे व रविंद्र वायकर. एका बाजुला उद्धव ठाकरे कागदावर १९ बंगलो उभे करतात, दुसऱ्या बाजुला मिलिंद नार्वेकर २५ कोटींचा बंगला बांधतात, तर तिसऱ्या बाजुला अनिल परब यांनी रिसॉर्ट तर बांधला पण रिसॉर्टच्या बाजुला अनिल परब यांचा बंगला देखील आहे आणि म्हणून आमची मागणी आहे. या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगल्यांची उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांसाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी.” अशी यावेळी सोमय्यांनी मागणी केली.
अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर –
”अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत. छगन भुजबळांना सर्वोच्च न्यायालयानेही तीन वर्षे तुरूंगात ठेवलं होतं. छगन भुजबळांनी १०० कोटी घोटाळ्याचे, महाराष्ट्र सदन आणखी घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या कंपनींद्वारे स्वतःच्या परिवाराच्या कंपनीत वळवले होते. अनिल देशमुख यांनी देखील कोट्यावधी रुपये, मग ते वाझे वसुली गँग असो की अन्य घोटाळे असो, त्याचा पैसा कोलकात्याच्या कंपनीत वळवला, कोलकात्याच्या कंपनीने देशमुख परिवारात आणि देशमुख परिवाराने त्या पैशांनी मोठाले उद्योग, राज्य बांधण्या ऐवजी इमारत बांधण्याची सुरूवात केली. ज्यांनी काळ्याचं पांढरं केलं, त्याच सीए व बोगस कंपन्यांनी मान्य केलं की कॅश देऊन चेक देत होते. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे.” असं किरोट सोमय्या यांनी सांगितलं.