एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या घरी छापा मारला होता. आता १८ मे रोजी समीर वानखेडेने चौकशीसाठी हजर रहा म्हणून सीबीआयने समन्स बजावलं आहे. समीर वानखेडेंना ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं आहे. सीबीआयकडून समीर वानखेडेंची चौकशी केली जाणार आहे.
बॉलिवूडचा किंग अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला समीर वानखेडेंनी कॉर्डिलिया क्रूझवरुन ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. याच प्रकरणात समीर वानखेडेंवर गंभीर आरोप आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटींची खंडणी मागितली होती हा त्यांच्यावर असलेला मुख्य आरोप आहे. तसंच सीबीआयने या प्रकरणी आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय आता मुंबईत समीर वानखेडेंची चौकशी करणार आहे. वानखेडेंच्या चौकशीसाठी सीबीआय दिल्लीचं पथक गुरुवारी मुंबईत येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आर्यन खान प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्याने समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. २ ऑक्टोबर २०२१ ला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान गेला होता. याच क्रूझवरून आर्यन खानला समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या सगळ्यांना त्या कारवाईत अटक झाली होती. आर्यन खानजवळ ड्रग्ज मिळाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आर्यन खानला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता. आर्यन खानवर कारवाई करणारे अधिकारी म्हणून समीर वानखेडे चर्चेत आले होते.
कोण आहेत समीर वानखेडे?
महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्रावीण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.
कस्टम विभागात आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं. त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय आणि दहशवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या NIA मध्येही त्यांनी काम केलं आहे. ऑगस्ट २०२० मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला होता.