मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास हा त्यांच्यापुरता मर्यादित ठेवायचा नसून या आरोपांशी संबंधित सगळ्या पैलूंचा तपास करायचा आहे. देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेही त्याला अपवाद नाहीत. परंतु या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याने तपासाला खीळ बसत असल्याचा दावा सीबीआयने सोमवारी उच्च न्यायालयात केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशमुख यांच्यावरील परमबीर यांनी के लेल्या आरोपांची सीबीआयने चौकशी केली. तसेच नंतर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या याचिके तून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा सामावून घेण्याचा तसेच पोलिसांच्या नियुक्त्या-बदल्यांबाबतचा भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी नियमित सुनावणी सुरू आहे.

Story img Loader