केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकालात गेल्यावर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा निकालाची टक्केवारी 87.33 आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा 16 लाख 80 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 19 हजार 607 विद्यार्थी परदेशातील होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी 87.33 टक्के विद्यार्थी म्हणजेच 14 लाख 50 हजार 174 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल 5.38 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्यावर्षी (2022) 92.77 टक्के होते. राज्याचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल 87.28 टक्के लागला आहे.

करोनापूर्वीच्या कालावधीपेक्षा निकालात वाढ

करोनाच्या साथीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत काही सवलती देण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी एखाद्या विषयाची परीक्षा न झाल्यास सरासरी काढून गुण देण्यात आले होते. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली होती. मात्र करोनाची साथ येण्यापूर्वीच्या परीक्षेचा निकाल म्हणजेच 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल यंदाच्या तुलनेत कमी लागला होता. 2019 मध्ये निकालाची टक्केवारी 83.40 होती. त्या तुलनेत यंदा निकाल जवळपास चार टक्क्यांनी वाढला आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परिक्षार्थींची संख्याही जवळपास 2 लाखांनी वाढली.

विभागनुसार निकाल

त्रिवेंद्रम ९९.९१,

बंगळुरू ९८.६४

चेन्नई ९७.४०

दिल्ली पश्चिम  ९३.२४

चंदीगढ ९१.८४

अजमेर ८९.२७

पुणे ८७.२७,

पंचकुला ८६.९३

पटणा ८५.४७

भुवनेश्वर ८३.८९

गुवाहाटी ८३.७३

भोपाळ ८३.५४

नोएडा ८०.३६.

या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल

https://www.cbse.gov.in
https://www.result.nic.in
https://www.results
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse class 12th result 2023 cbse announces class 12 board exam results mumbai print news zws
Show comments