दोन्ही दिशांना ट्रक टर्मिनल
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आणि ट्रक-टेम्पो चालकांना विश्रांती घेता यावी यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर द्रुतगती महामार्ग सहावरून आठपदरी करण्याच्या व जुना महामार्ग चारवरून सहा पदरी करण्याच्या प्रकल्पाचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. अभिनेता आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे यांच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा या महामार्गावरील अपघातांचा विषय ऐरणीवर आला. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) जयदत्त क्षीरसागर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संभाव्य उपाययोजनांबाबत चर्चा केली. अपघातानंतरच्या पहिल्या तासात उपचार मिळावेत यासाठी ट्रॉमा केंद्र व हवाई अॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी ओर्झाडे येथे प्रायोगिक तत्त्वावर हवाई अॅम्ब्युलन्सची सुविधा देण्याचे काम मंजूर करण्यात आले आहे.
या महामार्गावर नजर ठेवण्यासाठी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरले. अनेकदा ट्रक-टेम्पोचालकांना विश्रांती न मिळाल्याने डुलकी लागून अपघात झाल्याचे समोर येते. त्यामुळे महामार्गावर चालकांना विश्रांतीचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी खालापूरजवळील फूड मॉलनजीकच्या भागात दोन्ही दिशांना प्रत्येकी एक ट्रक टर्मिनस बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासाठी प्रत्येकी दहा एकर जागा लागेल व त्यावर एकावेळी १०० असे दोन्ही बाजूला मिळून २०० ट्रक उभे राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. चालकांना खाण्या-पिण्याची, स्वच्छतागृहांची व विश्रांतीची जागा उपलब्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या या महामार्गावर काही ठिकाणी ‘यू टर्न’ची जागा आहे. त्यांचे सर्वेक्षण करून त्यापैकी सुरक्षेच्या दृष्टीने काही ‘यू टर्न’ बंद करण्याची गरज पडल्यास तसा निर्णय घेण्यात येईल. हा महामार्ग सहा पदरीवरून आठ पदरी करणे, खोपोली ते लोणावळा दरम्यान सुमारे सहा ते आठ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून त्यातून रस्ता काढणे व जुना मुंबई-पुणे महामार्ग चार पदरीवरून सहा पदरी करण्याची योजना प्रलंबित आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचाही निर्णय यावेळी झाला.
मुंबई-पुणे मार्गावर लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आणि ट्रक-टेम्पो चालकांना विश्रांती घेता यावी यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर द्रुतगती महामार्ग सहावरून आठपदरी करण्याच्या व जुना महामार्ग चारवरून सहा पदरी करण्याच्या प्रकल्पाचा
First published on: 27-12-2012 at 04:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cc tv camera on mumbai pune way very soon