महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवनेरी गाडय़ांमध्ये आता अत्याधुनिक वायफाय यंत्रणा, जीपीएस तसेच ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात येणार आहे. सोमवारपासून या तिन्ही यंत्रणा लावलेल्या बसेस मुंबई-पुणे मार्गावर धावणार आहेत.
एसटी महामंडळाच्या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा गुंगीचे औषध देऊन लुटण्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटनांमध्ये गुन्हेगार सापडत नसल्याने गुन्ह्य़ाचा तपास लागू शकत नाही. यामुळे महामंडळाच्या बसेसमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्यात आले तर अशा घटनांना आळा बसून रात्रीचा प्रवासही निर्धोक होऊ शकतो. त्यामुळे महामंडळाने दादर, बोरिवली तसेच ठाणे येथून पुणे मार्गावर धावणाऱ्या १०० शिवनेरी बसेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी
सांगितले.
या तिन्ही यंत्रणा लावण्यात आलेल्या बसचे उद्घाटन सोमवारी सकाळी ९.३० विधान भवनासमोरील प्रांगणामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Story img Loader