राज्यातील कारागृहांना अद्ययावत करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत आता कारागृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर आणि मोबाईल जॅमर बसवले जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे.
पाटील यांनी नुकतीच राज्यातील कारागृहातील सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्थापनाची पाहणी केली. कारागृहातील बदलांच्या कामाला गती देण्यात यावी आणि तेथील माणसांची क्षमताही लवकरात लवकर वाढवण्यात यावी असे आदेश पाटील यांनी दिले आहेत.
कैदी आणि सुरक्षा रक्षक यांच्यातील गुणोत्तर प्रमाणामध्ये मोठी दरी असून ती भरून काढण्यात यावी. सहा कैद्यामाने एक सुरक्षा रक्षक असे गुणोत्तर प्रमाण असावे, असं पाटील म्हणाले.   
वाशिम, नंदुरबार, गडचिरोली, जालना आणि सिंधुदुर्ग येथील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही पाटील यांनी दिले आहेत.  

Story img Loader