मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी जलाशय उभारण्यात आले असून पश्चिम उपनगरातील पाच जलाशयांची सुरक्षितता लक्षात घेऊन परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वांद्रे – जोगेश्वरी परिसरातील पाच जलाशयांच्या परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी मुंबई महानगरपालिका ९३ लाख रुपये खर्च करणार आहे.

संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत तब्बल २७ सेवा जलाशये (रेझर्वोयर) उभारण्यात आली आहेत. जलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी जलशुध्दीकरण केंद्राजवळील महासंतुलन जलाशयात साठवले जाते. मग पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पुढील वितरणासाठी विभागले जाते. सेवा जलाशयातून जलवाहिन्याच्याद्वारे पाणी विविध परिसरातील ग्राहकांपर्यंत सुमारे ३ लाख ६० हजार जलजोडण्यांद्वारे पोहचविले जाते. या २७ जलाशयांपैकी वांद्रे व जोगेश्वरीदरम्यानच्या परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारलेल्या पाच जलाशयांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वेरावली टेकडी जलाशय क्रमांक १, २, ३ व वेरावली उच्चस्तर जलाशय, पाली टेकडी जलाशय अशा पाच जलाशयांची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी हा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे.  पोलीस उपायुक्त (सुरक्षा) यांनी दिलेल्या स्थळ चाचणी अहवालामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचित केले होते. यामुळे जलाशयाच्या सुरक्षिततेत वाढ होऊन चोरी व इतर अनुचित घटनांना आळा घालणे शक्य होणार आहे. महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने  तसा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. या कामासाठी ९३ लाख रुपये खर्च येणार आहे. यात ७९ लाखांचे कंत्राट व १४ लाखांचा वस्तू व सेवा कर याचा समावेश आहे.

BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Democracy media What the audience expects from the media
प्रसारमाध्यमे खरे प्रश्न मांडणार, की आक्रस्ताळ्या चर्चाच दाखवत राहणार?
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
msrdc new Mahabaleshwar project
नवीन महाबळेश्वरला केवळ १०० सूचना-हरकती, आराखड्यावर सूचना-हरकती नोंदविण्यासाठी अखेरचे ४ दिवस