मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीतील महिलांच्या डब्यातही आता ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक महिला डब्यात दोन ते पाच ‘सीसीटीव्ही’ बसविण्यात येणार असून येत्या दहा दिवसात सीसीटीव्ही कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
पश्चिम रेल्वेवर उपनगरी गाडीत महिलांच्या डब्यात ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘सीसीटीव्ही’ कंपन्यांना पुढील दोन वर्षे या डब्याच्या आत व बाहेर जाहिराती प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
डब्यात बसविण्यात येणाऱ्या या ‘सीसीटीव्ही’त ३० दिवसांचे चित्रीकरण होऊ शकते, असे मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वेवरही महिलांच्या डब्यात ‘सीसीटीव्ही’
पश्चिम रेल्वेवर उपनगरी गाडीत महिलांच्या डब्यात ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
Written by रत्नाकर पवार
First published on: 19-09-2015 at 05:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv in central railways ladies bogie