उद्वाहनात होणाऱ्या महिलांच्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी तसेच लोकांच्याही सुरक्षितेसाठी यापुढे उद्वाहनात सीसीटीव्ही आणि दर्शनी बाजूस काच बसविणे बंधनकारक करण्याबाबत विचार सुरू असून याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
लिफ्टमध्येच अडकण्याच्या घटना घडू नयेत यासाठी त्यामध्ये अतिरिक्त भारयंत्रणा आणि स्वयंचलित आपत्कालीन साहाय्य यंत्रणेचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. असेही त्यांनी या वेळी सांगितले. अनंत गाडगीळ व अन्य सदस्यांनी याबाबताच प्रश्न विचारलेला होता.

Story img Loader