पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात; १५६ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेने सुरू केली आहे. या कामासाठी १५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करून येत्या पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता येणार ओटीटीसह ५०० हून अधिक लाइव्ह चॅनेल्स
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Western Railway service disrupted mumbaiu print news
पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?

एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सोयीसुविधांचा आढावा घेतला होता. हा आढावा घेतल्यानंतर सरकते जिने, नवीन पादचारी पूल अशा सुविधांबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशाला मोटरमन आणि गार्डशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक यंत्रणा बसविण्याच्यादेखील पश्चिम आणि मध्य रेल्वेला सूचना करण्यात आल्या.

मध्य रेल्वेने लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही आणि टॉक बॅक यंत्रणा राबविण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यासाठी एकूण १५६ कोटी रुपये येणार असून त्यासाठी मध्य रेल्वे मुख्यालयातील लेखाविभागाकडून कामही केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ‘रिसर्च डिझाइन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’कडून (आरडीएसओ) लोकल गाडय़ांची पाहणीदेखील केली जात आहे. लवकरच सीसीटीव्ही आणि टॉक बॅक यंत्रणेसंदर्भात काही सूचनाही केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पुढील पावसाळ्याआधी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.

१६५

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील एकूण लोकल गाडय़ा.

या गाडय़ांमध्ये एकूण सहा हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविण्यात येतील.

’ लोकलच्या पुरुष किंवा महिलांच्या प्रत्येक मोठय़ा डब्यांत आठ ते दहा सीसीटीव्ही कॅमेरे

’ पुरुषांचा आणि महिलांचा प्रथम श्रेणी छोटय़ा डब्यांत मिळून आठ सीसीटीव्ही कॅमेरे

’ मालडब्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील.

टॉक बॅक यंत्रणा

लोकलमधील मोटरमन आणि गार्डशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. प्रत्येक महिला डब्यात साधारणा दोन ते तीन टॉक बॅक यंत्रणा असतील.