पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात; १५६ कोटींचा खर्च अपेक्षित
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया मध्य रेल्वेने सुरू केली आहे. या कामासाठी १५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करून येत्या पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सोयीसुविधांचा आढावा घेतला होता. हा आढावा घेतल्यानंतर सरकते जिने, नवीन पादचारी पूल अशा सुविधांबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशाला मोटरमन आणि गार्डशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक यंत्रणा बसविण्याच्यादेखील पश्चिम आणि मध्य रेल्वेला सूचना करण्यात आल्या.
मध्य रेल्वेने लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही आणि टॉक बॅक यंत्रणा राबविण्यासाठी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यासाठी एकूण १५६ कोटी रुपये येणार असून त्यासाठी मध्य रेल्वे मुख्यालयातील लेखाविभागाकडून कामही केले जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ‘रिसर्च डिझाइन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’कडून (आरडीएसओ) लोकल गाडय़ांची पाहणीदेखील केली जात आहे. लवकरच सीसीटीव्ही आणि टॉक बॅक यंत्रणेसंदर्भात काही सूचनाही केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पुढील पावसाळ्याआधी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
१६५
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील एकूण लोकल गाडय़ा.
या गाडय़ांमध्ये एकूण सहा हजारपेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविण्यात येतील.
’ लोकलच्या पुरुष किंवा महिलांच्या प्रत्येक मोठय़ा डब्यांत आठ ते दहा सीसीटीव्ही कॅमेरे
’ पुरुषांचा आणि महिलांचा प्रथम श्रेणी छोटय़ा डब्यांत मिळून आठ सीसीटीव्ही कॅमेरे
’ मालडब्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील.
टॉक बॅक यंत्रणा
लोकलमधील मोटरमन आणि गार्डशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. प्रत्येक महिला डब्यात साधारणा दोन ते तीन टॉक बॅक यंत्रणा असतील.