अवघ्या काही मिनिटांमध्ये दक्षिण मुंबईतून थेट चेंबूरला पोहोचविणाऱ्या पूर्व मुक्त मार्गावर करडी नजर ठेवण्यासाठी महापालिका आठ सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार आहेत. भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक ओळखता यावेत यासाठी तेथे चार स्वयंचलित कॅमेरेही बसविण्याचा मानस आहे. यासाठी लागणारे पैसे एमएमआरडीएकडून पालिकेला देण्यात येणार आहेत. वाहतूक कोंडी, अपघात आणि सुरक्षिततेच्या कारणासाठी महापालिका मुंबईतील रस्त्यांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार आहे. दक्षिण मुंबईमधून झटपट चेंबूर येथे पोहोचण्यासाठी सध्या पूर्व मुक्त मार्गाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. या मार्गावरुन भरधाव वेगामध्ये काही मिनिटांमध्ये चेंबूर येथे पोहोचता येते. १३.५८ कि.मी. लांबीच्या या मार्गावरील वाहतूक लक्षात घेऊन पालिकेने तेथे आठ ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविले आहे. यासाठी ६० लाख ८३ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
पूर्व मुक्तमार्गावर सीसीटीव्ही!
अवघ्या काही मिनिटांमध्ये दक्षिण मुंबईतून थेट चेंबूरला पोहोचविणाऱ्या पूर्व मुक्त मार्गावर करडी नजर ठेवण्यासाठी महापालिका आठ सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार आहेत.
First published on: 17-06-2014 at 12:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv to be fit on eastern free expressway mumbai