मुंबईमधील वसई रेल्वे स्थानकावरील एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला ती झोपेत असतानाच धावत्या एक्सप्रेस ट्रेन खाली ढकलून दिलं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास सुरु केला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी पत्नीला पकडून प्लॅटफॉर्म उभा असल्याचं दिसत आहे. ही महिला झोपेत असल्याचंही व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. एक्सप्रेस ट्रेन येण्याआधी ही व्यक्ती पत्नीला रेल्वे ट्रॅकवर ढकलून देते. या महिलेचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पत्नीला धावत्या ट्रेनसमोर ढकलून दिल्यानंतर ही व्यक्ती मागील बाकड्यावर बसलेल्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घटनास्थळावरुन पळून जाते.

या प्रकरणामध्ये रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

हा सारा प्रकार २२ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी घडल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

Story img Loader