आपल्या सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी सर्वांना कोरड्या रंगांनी होळी खेळण्याचे आवाहन केलंय.
महाराष्ट्राच्या काही भागात यंदा तीव्र दुष्काळी स्थिती आहे. एक हंडा पाण्यासाठी सर्वसामान्य लोकांना अनेक मैल पायपीट करावी लागते आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी कोणीही करू नये, असे आवाहन सर्वच मान्यवरांकडून करण्यात येते आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सर्वांना होळीच्या शुभेच्छा देताना पाण्याचा वापर करू नका, असे म्हटले आहे. राज्यात आणि देशात पाण्याची टंचाई असल्याचे त्यांनी संदेशात लिहिले आहे.
हिंदी चित्रपट निर्माता करण जोहर यानेही होळीनिमित्त धम्माल करताना पाण्याचा वापर न करण्याचे आवाहन केलंय. यंदा कोरडी होळी खेळा, असा संदेश त्याने ट्विटरवर दिलाय. अभिनेता अनुपम खेर यानेही आपल्या ट्विटमध्ये होळी खेळताना महाराष्ट्रातील दुष्काळाची आठवण ठेवा, असा संदेश दिलाय. कोरडी होळी खेळण्याचे आवाहन त्यानेही केलंय.
होळी सेलिब्रेट करा, पण पाण्याचा वापर टाळा: कलाकारांचे ट्विट्स
आपल्या सर्व चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी सर्वांना कोरड्या रंगांनी होळी खेळण्याचे आवाहन केलंय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-03-2013 at 11:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrate holi but keep it dry says bollywood actors