काल (बुधवार) रात्री उशीरा बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती खूपच चिंताजनक असल्याची माहिती मिळाल्यानंतर विविध क्षेत्रातील मंडळींनी काल रात्रीपासूनच मातोश्रीला भेट द्यायला सुरूवात केली आहे. कला, राजकारण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रातींल मंडळी येथे हजेरी लावत आहेत. तसेच शिवसेनेच्या हजारो शिवसैनिकांनी काल रात्रीपासूनच मातोश्रीच्या बाहेर गर्दी करायला सुरूवात केली आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.आर.पाटील आणि राष्ट्रवादीचे नेचे मधुकरराव पिचड हेसुध्दा मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी पोहोचणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल रात्रीच आपल्या कुटुंबीयांसमवेत मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार बाळा नांदगावकर हेसुध्दा उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा